Contributors

Thursday 4 May 2017

आनंदी राहण्याची गुरुकिल्ली ! 😊😊😁😄

आपल्या तोडीचंच किंवा त्यापेक्षा थोडा वरचढ "सेन्स ऑफ ह्यूमर" म्हणजे विनोदबुद्धी असणारं 'फ्रेंड सर्कल' असणं ह्यासारखं दुसरं भाग्य नाही आणि आपण मारलेला एखादा पंच समोरच्याला समजावून सांगायची वेळ येणे ह्यासारखं दुर्भाग्य नाही. :(
समोरासमोर नसतानासुद्धा गप्पा मारताना टाईप केलेल्या वाक्यांमधून हवा तो अर्थ पटकन समजून, त्याचा अजून वेगळाचं अर्थ काढून बोललेलं वाक्य भलतीकडेचं नेऊन ठेवणे ह्यातली मजा अवर्णनीय आहे. वयाच्या बंधनाला अमान्य करून वाह्यातपणा चालू ठेवला की, बुद्धी ताजीतवानी राहते आणि मेंदू अखंड क्रिएटिव्ह राहतो.
"अरे तुझं वय काय, बोलतोयस काय?" हा प्रश्न ज्याला पडतो ती माणसं अकाली वृद्ध होतात. येता जाता केलेला फालतूपणा हा आपले हॅप्पी हार्मोन्स अबाधित ठेवतात,
एखादी गोष्ट सिरियसली न घेता अतिशयोक्ती वगैरे करून त्याची पार वाट लावणं ज्याला जमतं तेच खरे मित्र!
एकमेकांच्या वरचढ कोटी करून विनोदाची हद्द गाठणे, हेच खरं जीवन! बाकी सब मोहमाया!!
थोडक्यात काय ;
प्रत्येक प्रसंगात आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवा आणि शक्य तेवढा त्याचा वापर करा.
या आयुष्यात ज्याने कधी वाह्यातपणा नाही केला त्याचं असणं काय अन् नसणं काय एकूण एकचं !
बाकी तुमची मर्जी ! 
माझं नशीब त्यामानाने बरचं चांगलं आहे असे म्हणावं लागेल कारण माझ्या मित्रमंडळीत बरेच जन्मताच वाह्यात पोट्टे आणि आगाऊ पोरी आहेत  You Know ! It Feels Like God Have Already Bless Me With Those Educated Morons !
Sometime Having Them Just Like It's Sucks ! But Once You Got Habit Of That You're Gonna Love It !
Sarcastically ज्याला बोलणे जमते त्याच्या सोबत असणारे लोक कधीही बोअर होत नाही.
Sarcasm चं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जगप्रसिद्ध इंग्लिश दूरचित्रवाणी मालिका 'F.R.I.E.N.D.S' मधील CHANDLER नावाचं पात्रं !
शेवटी एवढेच म्हणेन की
जेवढा वाह्यातपणा कराल तेवढेच तुमचे हॅपी हार्मोन्स जास्त स्रवतील आणि तुम्ही जास्त आनंदी राहाल !
© साकेत दलाल.

No comments:

Post a Comment

आनंदी राहण्याची गुरुकिल्ली ! 😊😊😁😄

आपल्या तोडीचंच किंवा त्यापेक्षा थोडा वरचढ "सेन्स ऑफ ह्यूमर" म्हणजे विनोदबुद्धी असणारं 'फ्रेंड सर्कल' असणं ह्यासारखं दुसर...