Contributors

Tuesday 2 May 2017

BAAHUBALI 2 - THE CONCLUSION चित्रपट समीक्षण



आज "BAAHUBALI 2 - THE CONCLUSION" बघितला. एस एस राजामौलीने एक अत्यंत जबरदस्त चित्रपट बनविला आहे. किंबहुना बाहुबली भाग एक पेक्षा अत्यंत सरस चित्रपट म्हणता येईल. तब्बल ४ वर्षे दिग्दर्शक राजामौलीने अभिनेता प्रभास व राणा दग्गुबत्तीने या चित्रपटावर मेहनत घेतली आहे. फक्त बाहुबलीसाठी प्रभासने आपले लग्नाची तारीख पुढे ढकलली. या बाहुबलीसाठी जगभरातील २० टॉप VFX कंपन्या गेली ४ वर्षे अखंड कार्यरत होत्या. चित्रपट बघितल्यावर याची प्रचिती येते. संपूर्ण राजवाडा, युद्धप्रसंग किंवा अगदी ''बाजीराव-मस्तानी'' चित्रपटात दाखविल्याप्रमाणे बैलांच्या शिंगांना जळते पलिते लावलेला प्रसंग असो की धरणाचा बांध फोडल्यावर बाहेर पडणारे तुषार असो असो, VFX तंत्रज्ञानाची कमाल दिसते.  


महाभारतकालीन अनेक देशांचा उल्लेख चित्रपटात केलेला आहे मात्र प्रेक्षकांना ते उल्लेखित देश आजच्या काळात नेमक्या कोणत्या भूभागावर होते हे कळावे म्हणून सोबत अत्यंत दुर्मिळ असा महाभारतकाळीं कालीन आर्यावर्ताचा नकाशा सोबत जोडीत आहे. आपल्या लहानपणी बहघितलेल्या ''जय श्रीकृष्ण'' मालिकेची चित्रपटातील युद्धप्रसंग पाहतांना राहून राहून आठवण होते. त्या काळात एखाद्या रथीला रथहीन करणे म्हणजे रथ मोडणे हा प्रचंड मोठा अपमान समजला जात असे. ते नक्की काय असते याची प्रचिती बाहुबली बघतांना येते.  


चित्रपटातील एक मला अत्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे विविध प्रसंगात केलेली अनुष्का शेट्टीची रंगभूषा-केशभूषा आणि वेशभूषा.अनुष्का शेट्टीची एक राजकन्या म्हणून,एक प्रेयसी म्हणून, एक राजमाता म्हणून केलेली वेशभूषा आणि रंगभुषा निश्चितच प्रेक्षकांच्या मनात भाव खाऊन जाते. विशेषतः कुन्तल देशाची राजकुमारी म्हणून देवसेनेने दाखवलेला बाणेदारपणा, तडफ वाखाणण्याजोगी आहे.इतकच नव्हे तर त्याकाळात देखील एका क्षत्रिय स्त्रीला आपला जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य होते हे देखील दिसते. निष्कपट वृत्ती, कपटीपणा, राजशिष्टाचार, प्रेम, आत्मीयता, ममत्व, शौर्य, बुद्धिचातुर्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट वापर या सर्व गुणांचा एक उत्कृष्ट कथामिलाफ़ म्हणून या कलाकृतीला चित्रपट इतिहासात गणले जाईल. गेली चार वर्षे प्रेक्षक ज्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पागल झाले होते त्या प्रश्नाचे उत्तर आज जगासमोर आहे. माझ्यामते आतापर्यंतचा मी मारधाड/सस्पेंस कॅटेगरीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. 

मुळात चित्रपट यशस्वी याचे मूळ कारण म्हणजे याची हिंदू धर्मावर आधारीत कथा आहे. यात कुठेही धर्मनिरपेक्ष नावाचा मूर्खपणा नाहीये. जेवढं हिंदू धर्मीय कथेवर चित्रपट काढला तर तो चालणार नाही ही समज असलेल्या बॉलीवूडच्या सर्व तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांसाठी ही एक सणसणीत चपराक आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आपले बॉलीवूडवाले यातून काही बोध घेतील अशी आशा बाळगुयात. 


एकूणच चित्रपट जबरदस्त आहे आणि प्रत्येकाने तो चित्रपटगृहातच जाऊन बघावा असा आहे. 

MY RATING 4-1/2* OUT OF 5*.
जय माहिष्मती ! जय माहिष्मती !! जय माहिष्मती !!! 


 © SAAKET DALAL.



😎https://www.facebook.com/saketd3cdkllkc

No comments:

Post a Comment

आनंदी राहण्याची गुरुकिल्ली ! 😊😊😁😄

आपल्या तोडीचंच किंवा त्यापेक्षा थोडा वरचढ "सेन्स ऑफ ह्यूमर" म्हणजे विनोदबुद्धी असणारं 'फ्रेंड सर्कल' असणं ह्यासारखं दुसर...